Rajiv Gandhi International Airport: भारताची स्टार महिला क्रिकेटपटू मिताली राजनं (Mithali Raj) आज भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतली. त्यानंतर मिताली राज राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चांना उधाण आलंय. तेलगू राज्यात भाजप मजबूत पकड बनवण्याच्या तयारीत लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप तेलगू राज्यातील दिग्गजांना आपल्या पक्षात सामील करण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, मिताली राज आणि जेपी नड्डा यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोनंतर विविध चर्चांना सुरुवात झालीय.


मिताली राज राजकीय इनिंगला सुरुवात करण्याची शक्यता
जेपी नड्डा यांच्यासोबतच्या भेटीनंतर मिताली राज राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महत्वाचं म्हणजे, तेलगू राज्यात भाजप स्वत:ला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपनं मिताली राजला त्यांच्या पक्षात सामील करून घेतल्यास त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मिताली राजची जगातील महान महिला क्रिकेटपटूंच्या यादीत गणना केली जाते. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
मिताली राजनं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. मिताली राजनं 1999 मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मितालीनं तिच्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक करणारी महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकदिवसीय कारकिर्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या पेक्षाही मोठी आहे. 


निवृत्तीदरम्यान मिताली राजची भावनिक पोस्ट
मिताली 2012 सालच्या त्या क्षणांना आठवताना म्हणाली, "महान भारतीय क्रिकेटर राहुल द्रविडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यावेळी राहुल अत्यंत भावूक झाला असून त्याचे डोळेही पानावले होते. दरम्यान राहुलला इमोशनल पाहून माझ्याही मनात रिटायरमेंटचा विचार आला होता. त्यावेळी मी विचार केला होता की, मी जेव्हा निवृत्ती घेईन तेव्हा मला कसं वाटेल? मी देखील अशीच भावूक होईन का? हे सर्व विचार माझ्या मनात त्यावेळी आले होते."


हे देखील वाचा-