Dilip Vengsarkar majha Katta : आपल्याकडे टॅलेंट भरपूर आहे. पण आता पूर्वीच्या क्रिकेटसारखी क्वालिटी राहिली नसल्याचे वक्तव्य माजी भारतीय क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांनी केले. मी माझ्या क्रिकेट करियरमध्ये शतक करायचे म्हणून कधीच खेळलो नाही, मॅच जिंकायची म्हणूनच खेळलो. 1986 ला आम्ही प्रथमच लॉर्डस्‌वर जिंकलो, त्यावेळी मी नॉट आऊट 126 धावा केल्या होत्या. मॅच जिंकायची असाच माझा निर्धार असायचा असे वेंगसरकर यांनी सांगितले. तसेच विराटने क्रिकेट खेळायला पाहिजे, त्याने आता विश्रांती घेऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला. 


एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी माजी भारतीय क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांच्याशी यांच्याशी संवाद साधला. यावेळी वेंगसरकर यांनी दिलखुलास संवाद साधला. 


धोनीचा अॅप्रोच खूप आवडला


खेळाडूवर जर दबाव आला तर ते खेळू शकत नाहीत. जे दबाव घेत नाहीत ते चांगला खेळ करु शकतात. प्रेक्षक कितीही असू देत तुमचे लक्ष खेळावर असावे असे वेंगसरकर म्हणाले. मला धोनीचा अॅप्रोच खूप आवडला. त्याची देहबोली खूप सकारात्मक वाटली. सचिन, राहुल म्हणाले धोनी हुशार आहे. ते म्हणाले धोनीला कॅप्टन करायला हरकत नसल्याचे वेंगसरकर यांनी सांगितले. त्यावेळी कोलकत्यावरुन मुंबईला येताना धोनीशी बोलायचे होते. मात्र तो विमानात झोपल्याचे वेंगसरकर यांनी सांगितले. 




विराटने विश्रांती घेऊ नये


विराटने क्रिकेट खेळायला पाहिजे. त्याने आता विश्रांती घेऊ नये. कारण ज्यावेळी धावा होत नाहीत तेव्हा विश्रांती घेऊ नये. धावा करत असताना विश्रांती घेतली तरी हरकत नसल्याचा सल्ला वेंगसरकर यांनी विराटला दिला. मागील काही दिवसांपासून विराट कोहली फॉर्ममध्ये नसल्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. यामध्ये माझी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही समावेश होता. पण एबीपी माझाशी बोलताना दिलीप वेंगसरकर यांनी विराटने कोहलीनं विश्रांती घेऊ नये असा सल्ला दिला. चित्रपटात काम करणे हा माझा विषयच नव्हता. ज्या खेळाडूंनी चित्रपटात काम केले त्यांचे  चित्रपट मी बघितले आहेत. ते आपल्याला हे जमणार नसल्याचे ते म्हणाले. तेवढा वेळही माझ्याकडे नव्हता असेही ते म्हणाले.


आमच्या घरामध्ये क्रिकेटचे वातावरण नव्हते. पण हिंदू कॉलनीमध्ये आम्ही क्रिकेट खेळायचो. माटुंगाला टेस्ट क्रिकेट खेळले जायचे. त्यावेळी मी तिकडे केळायला जात होतो असेही त्यांनी सांगितले. मी वयाच्या 12 व्या वर्षी माझ्या शाळेसाठी पहिली मॅच खेळलो होतो. त्यावेळी मी 10 नंबरला बँटींग करुन नॉट आऊट 10 धावा केल्याची आठवण वेंगसरकर यांनी सांगितली. त्यानंतर 1974 ला 17 ते 18 वर्षाचा होतो त्यावेळी मुंबई संघात निवड झाली. त्यावेळी एका दिवसाला 25 रुपये मिळायचे. 1975 ला भारतीय संघात निवड झाली. 1976 ला न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज टूर होती. त्या टूरवर जाण्याची संधी मिळाली. त्यासाठी आम्हाला 5 हजार रुपये मिळाले होते. आता क्रिकेट बदलले आहे. पण याचा आनंद वाटत असल्याचे दिलीप वेंगसकर म्हणाले.




सुनिल गावसकर चांगला कर्णधार


मी ज्याच्या अंडर क्रिकेट खेळलो त्यापैकी सुनिल गावसरकर चांगले कर्णधार होते. गावसकर प्रेरणादायी होता. कपिलदेव पण चांगला कर्णधार होता. त्याच्यामुळेच 1983 वर्ल्ड कप आपण जिंकलो असल्याचे त्यांनी वेंगसरकर यांनी सांगितले. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधारांचा विचार केला तर त्यावेळी इम्रान खान चांगला कर्णधार होता असे ते म्हणाले.
दरम्यान, 1983 च्या वर्ल्ड कपवेळी मला बॉल लागला आणि मी जखमी झालो होतो. त्यामुळे फायनल मी खेळू शकलो नाही. आमच्या विजयी संघातील प्रत्येक खेळाडूला त्यावेळी 25 हजार रुपयांची घोषणा केली. तेव्हा आम्हाला खूप आनंद झाल्याचे वेंगसरकर यांनी सांगितले.


बाळासाहेब ठाकरे आणि जावेद मियाँदाद यांची भेट


जावेद मियाँदाद तेव्हा एका इंटरव्हीव्हसाठी मुंबईत आलाा. त्यावेळी त्याने मला बोलावले होते. त्यानंतर जावेद मियाँदादा बाळासाहेब ठाकरे यांना भेटला होता. यावेळी त्याने मुंबईत भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅच झाली पाहिजे असे बाळासाहेबांना सांगितले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, भारत पाक यांच्यात मुंबईत मॅच होणार नाही, ही आठवण वेंगसरकर यांनी सांगितली.
 
1991 ला मुंबई हरली तेव्हा वाईट वाटले


1991 ला मुंबई हरियाणाविरुद्ध हरली तेव्हा खूप वाईट वाटल्याचे वेंगसरकर यांनी सांगितले. कारण आम्ही फक्त दोन रणांनी हरल्याचे त्यांनी सांगितले. शेवटच्या दिवशी आम्हाला 365 धावांची गरज होती. 20 धावांवर आमच्या 3 विकेट पडल्या होत्या. त्या मॅचमध्ये सचिन अप्रतिम खेळला असे वेंगसरकर यांनी सांगितले. फक्त 2 रणांनी मॅच हरलो होतो. त्यावेळी खूप वाईट वाटल्याचे वेंगसरकर यांनी सांगितले. 


ऑस्ट्रेलिया टूरनंतर निवृत्तीचा निर्णय घेतला


मी ज्यावेळी ऑस्ट्रेलिया टूरवर होतो, त्यावेळी 36 वर्षाचा होतो. त्या टूरनंतर आता बस करायचे असे मी ठरवले होते. त्यानंतर मुंबईत मी एमपी विरोधात मॅच खेळलो आणि निवृत्तीची घोषणा केली. त्या सामन्यात मी 283 धावा केल्याचे वेंगसरकर यांनी सांगितले.


संजय मांजरेकर आणि सचिन भीती दाखवायचे


मला काळोखाची भीती वाटायची. त्यामुळे मी टूरवर गेल्यावर लहान रुम मागत होतो.  पण संजय मांजरेकर सचिन तेंडूलकर माझ्याशी मस्ती करायचे. ते मला भीती दाखवत असल्याचे वेंगसरकर यांनी सांगितले. ते दोघे संध्याकाळी माझ्याकडे यायचे आणि मला म्हणायचे रात्री असे झाले आणि तसे झाले त्यामुळे मला भीती वाटायची असे वेंगसरकर म्हणाले.