Abhishek Sharma Half Century : या वर्षी जुलैमध्ये अभिषेक शर्माने झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या टी-20 मालिकेत शतक झळकावून चर्चेत आला होता. पण त्यानंतर त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली. बांगलादेशविरुद्धची टी-20 मालिका असो किंवा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिले दोन सामने अभिषेक शर्मा फ्लॉप ठरला. त्यानंतर टीकाकारांना त्याच्यावर अनेक शंका घेण्यास सुरुवात केली होती, परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा सामन्यात त्याने टीकाकारांना मैदानातच सडेतोड उत्तर दिले.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील चार सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
शानदार फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्माने अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच विकेट गमावली. केशव महाराजांच्या चेंडूवर अभिषेकने पुढे जाऊ मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू चुकला आणि यष्टिरक्षकाच्या हातात गेला, ज्यानी त्याला यष्टीचित केले. यासह अभिषेक आणि तिलक यांच्यातील दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी तुटली. अभिषेक 25 चेंडूंत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 50 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका : रायन रिक्लेटन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (क), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्के जेन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुथो सिपामला.
हे ही वाचा -