MPL 2023 : पुण्यात सुरु असलेल्या एमपीएल स्पर्धेत नाशिकच्या अर्शिन कुलकर्णी याने अष्टपैलू खेळी करत सर्वांचे लक्ष वेधलेय. पुणे संघाविरोधात अर्शिन कुलकर्णी याने आधी वादळी शतक झळकावले, त्यानंतर गोलंदाजीत चार विकेट घेतल्या. अर्शिन कुलकर्णी याच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर नाशिकने पुणे संघाचा एका धावेनं पराभव केला. नाशिकने या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकविले. त्याशिवाय आपले प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले.  अर्शिन कुलकर्णी याने नाबाद 117 धावांची खेळी केली, त्यानंतर गोलंदाजीत 21 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. अर्शिन कुलकर्णी याच्या कामगिरीची सध्या महाराष्ट्रातल्या क्रिकेट प्रेमीमध्ये चर्चा सुरु आहे. 


प्रथम फलंदाजी करताना अर्शिन कुलकर्णी याने 54 चेंडूत 3 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने नाबाद 117 धावांची खेळी केली. अर्शिन कुलकर्णी याच्या खेळीच्या बळावर नाशिकने निर्धारित 20 षटकात 203 धावांपर्यंत मजल मारली. एमपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रमही अर्शिन कुलकर्णी याच्या नावावर जमा झालाय.  


फलंदाजीनंतर  अर्शिन कुलकर्णी  याने गोलंदाजीतची चमकदार कामगिरी केली. चार षटकात 21 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेत विजयात महत्वाची भूमिका बजावली. इतकेच नाही तर अखेरच्या 20 षटकात अर्शिन कुलकर्णी याने सहा धावांचा बचाव यशस्वीपणे केला. नाशिकने पुणे सघांचा अवघ्या एका धावेनं पराभव केला. 


पाहा अर्शिन कुलकर्णी याच्या फलंदाजीचा व्हिडीओ -


 






 एमपीएलमधील सर्वात वेगवान शतक -


महाराष्ट्राचा १९ वर्षाखालील खेळाडू अर्शिन कुलकर्णीने आपला गियर बदलत आक्रमक पवित्रा स्वीकारला. अर्शिन ३७ चेंडूत ३ चौकार व ७ षटकाराच्या मदतीने नाबाद ७२ धावांची तुफानी फलंदाजी करत असतानाच पुण्याच्या पवन शहाने त्याचा झेल सोडून जीवदान दिले व त्याला षटकारही मिळाला. त्यानंतर अर्शिनने रोहन दामलेच्या याच षटकात सलग तीन षटकार मारले व नाबाद ९६ धावांवर पोहोचला. त्यानंतर अर्शिनने ४६ चेंडूत नाबाद १०० धावा करून एमपीएलमधील यावर्षीचे सर्वात जलदगतीने शतक करण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. 


अखेरच्या षटकात फक्त चार धावा दिल्या - 


अखेरच्या षटकात 6 चेंडूत 6 धावांची आवश्यकता असताना अर्शिनने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही कमाल दाखवत पहिल्याच चेंडूवर अद्वैय शिधयेला, तर तिसऱ्या चेंडूवर हर्ष सांघवीला झेल बाद केले व संघाला 1 धावेने थराराक विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी अष्टपैलू कामगिरी करणारा अर्शिन कुलकर्णी ठरला.            


आणखी वाचा :


Asia Cup 2022 : भारत पाकिस्तानवर कायमच वरचढ, आशिया कपमधील सर्व सामन्याचे निकाल एका क्लिकवर


Asia Cup 2023 : आशिया चषकात टीम इंडिया सर्वात यशस्वी संघ, पाकिस्तानला फक्त दोन वेळा जेतेपद


Asia Cup 2023 : मोठ्या वादावर पडदा, आशिया चषकाच्या तारखा ठरल्या, पाकिस्तानमध्ये भारत जाणार की नाही? अखेर निर्णय झाला!


IND vs PAK :  मौका... मौका... आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान महासंग्राम तीन वेळा होणार ?