Ind vs WI 1st Test :अश्विन आणि जाडेजा यांच्या भेदक फिरकीनंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीवर वर्चस्व मिळाले आहे. वेस्ट इंडिजला 150 धावांत रोखल्यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी विकेट न फेकता वेस्ट इंडिजची आघाडी मोडून काढली. यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतकी खेळी केली आहे. 330 पेक्षा जास्त चेंडूचा सामना करत या दोघांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. पहिल्या दिवशी या या जोडीने बिनबाद 80 धावांची खेळी केली होती. आज त्यामध्ये आणखी भर टाकत भारताला आघाडी मिळवून दिली आहे. यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा यांनी 150 पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली आहे. वेस्ट इंडिजचा संपूर्ण डाव 150 धावांत संपुष्टात आला होता. भारतीय संघाने एकही विकेट न फेकता ही धावसंख्या पार केली आहे. 


पदार्पण करणाऱ्या यशस्वी जायस्वाल याने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. यशस्वी जायस्वाल याने रोहित शर्माला चांगली साथ दिली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी तुफानी केली आहे. यशस्वी जायस्वाल याने पदार्पणातच अर्धशतक झळकावत आपली प्रतिभा दाखवून दिली. यशस्वी जायस्वाल 67 तर रोहित शर्मा 68 धावांवर खेळत आहे. यशस्वी जायस्वाल याने सात चौकार लगावले. तर रोहित शर्माने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी शतकाकडे वाटचाल सुरु केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. भारतीय संघाकडे सध्या आघाडी झाली आहे.  




यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा यांच्या जोडीपुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज हतबल झाले. एकाही गोलंदाजाचा मारा प्रभावी वाटला नाही. वेस्ट इंडिजने सात गोलंदाजाचा वापर केला, पण एकालाही विकेट घेता आली नाही. रोहित शर्माने कसोटीत मोठा विक्रम नावावर केला आहे. कसोटीमध्ये सलामीला रोहित शर्माने 39 डिवात सहा शतके आणि पाच अर्धशतके झळकावण्याचा विक्रम केलाय. त्याशिवाय कसोटीमध्ये रोहित शर्माने 3500 धावांचा पल्ला पार केला आहे. रोहित शर्माने 46 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. 2019 मध्ये रोहित शर्मा कसोटीत सलामीला उतरला अन् तेव्हापासून त्याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. सलामीला फलंदाजी करताना 50 पेक्षा जास्त धावा काढण्यात रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.