Abhigyan Kondu : आपण जेवढ्या वेळ झोपत नाही किंवा कार्यालयात काम करीत नाही, तेवढा वेळ 13 वर्षाचा एक चिमुकला मैदानात घाम गाळतो. तब्बल 12 तास मैदानात क्रिकेटचा सराव करणारा हा अवलिया म्हणजे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहणारा 
अभिग्यान कुंडू. अभिग्यानने तीन वर्षांत 28 हजार रन बनवले असून शतकांचा तर पाऊसच पाडला आहे. अभिग्यान हा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहत असून त्याचं वय फक्त 13 वर्षे आहे. विशेष म्हणजे 13 व्या वर्षीच गड्यांन अनेक मोठे रेकॉर्ड नावे केले आहेत.


मागील तीन वर्षात 516 मॅचमध्ये त्याने 28 हजार धावा केल्या आहेत. महाराष्ट्रा बरोबर संपूर्ण देशात आता तो हळूहळू नावारूपाला येत असून विशेष म्हणजे तो डावखुरा फलंदाज आहे. यष्टीरक्षक फलंदाज असल्याने त्याचं भविष्य उज्वल असणार यात शंका नाही. आतापर्यंत हजारो धावांचा पाऊस पाडताना त्याने दोन वेळा चारशेहून अधिक धावा देखील केल्या आहेत. तब्बल 93 शतकं आणि 121 अर्धशतकं अभिग्यानच्या नावावर आहेत. दिवसाला 12-12 तास मैदानावर घाम गाळणारा अभिग्यान सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सराव करतो. सकाळी 10 ते 7 वाशीतील साळवी फाऊंडेशनच्या मैदानावर आणि संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत घराच्या आवारात बांधलेल्या नेटमध्ये तो सराव करत असतो. अभिग्यान बॅटींगसोबत बोलिंग आणि विकेटकिपिंग सुध्दा करतो. 


पाच वर्षाचा असताना अभिग्यान याने वाशीतील साळवी फाऊंडेशन मध्ये खेळायला सुरवात केली. येथील क्रिकेट कोच असलेले चेतन जाधव अभिग्यानसाठी एक दिवसही सुट्टी घेत नाहीत. दिवसाला अभिग्यान कडून जवळपास पाच हजार बॅाल खेळवून घेतात. यामध्ये प्लॅस्टीक बॅट आणि सिंथॅटीक बॅालचाही समावेश आहे. त्यामुळे अभिग्यानचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. त्याच्या खेळ धडाकेबाज असल्यानं तो इतके सारे रन करतो असं त्याचे कोच चेतन जाधव सांगतात.


म्हणून अंडर 16 मध्ये निवड नाही


इतक्या दमदार खेळानंतरही बीसीसीआयच्या कमी वयाच्या नियमामुळे अभिग्यानची आतचापर्यंत अंडर 16 टीम मध्ये निवड होत नाही. प्रोफेसर असलेल्या आईने अभिग्यानसाठी आपली नोकरी देखील सोडली आगे. वडिल टीसीएस कंपनीत काम करतात. अभिग्यान देशातील क्रिकेट टीममध्ये सिलेक्ट होवून चांगले नाव कमवावे अशी आईवडीलांची इच्छा आहे. अभिग्यानचा एकही दिवस सराव बुडू नये यासाठी कोणत्याही घरगुती कार्यक्रमाला आपण उपस्थिती लावत नसल्याचे आई विनाता कोंडू यांनी सांगितले. खेळामुळे त्याला शाळेत जाता येत नसल्याने शाळेने यावर उपाय म्हणून त्याला होम स्कूलची परवानगी दिली आहे. 


अभिग्यान कुंडूचा स्कोरबोर्ड


अभिग्यान याने आतापर्यंत अनेकदा 400 हून अधिक धावा केल्या असून यामध्ये 191 चेंडूत नाबाद 457 धावा ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. यामध्ये त्याने 86 चौकार आणि 13 षटकार ठोकले होते. याशिवाय नाबाद 408, नाबाद 356, नाबाद 320 धावा देखील त्याने ठोकल्या आहेत. आतापर्यंत त्याने नऊ दुहेरी शतक तर 93 शतकं ठोकली आहेत. 121 अर्धशतकंही त्याच्या नावावर आहेत. विशेष म्हणजे अभिग्यान आतापर्यंत 516 सामने खेळला असून यातील 151 इनिंगमध्ये तो नॅाट आऊट राहिला आहे. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha