करुण वयाच्या दहाव्या वर्षापासून क्रिकेट खेळतो, त्याच्या नसानसात क्रिकेट आहे, अशी पहिली प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांना सामन्यानंतर दिली.
मुलाच्या ऐतिहासिक कामगिरीचा आपण साक्षिदार झालो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहचण्यासाठी त्याने कठिण मेहनत घेतली आहे. पाच वर्ष प्रथम श्रेणी क्रिकेट आणि दोन वर्षे रणजी क्रिकेट त्याने खेळलं, असं करुणच्या वडिलांनी सांगितलं.
आपल्या मुलाला भेटल्यावर काय बोलणार?, या प्रश्नाचंही करुणच्या वडिलांनी उत्तर दिलं. आपण मैदानात होतो . मात्र त्याच्याशी हॉटेलमध्येच भेट होईल. पण आपल्याला हे यश लार्जर दॅन लाईफ बनवायचं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा दुसराच भारतीय
इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि मालिकेतील शेवटच्या कसोटीत करुण नायरने 303 धावांची विक्रमी खेळी केली. तो कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला. याआधी वीरेंद्र सहवागने कसोटी क्रिकेटमध्ये दोनवेळा त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर आता करुण नायरनं इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्रिशतक साजरं केलंय.
सेहवागने 2004 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मुल्तान कसोटीत 309 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर 2008 मध्ये चेन्नईतच सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 319 धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या :