नवी दिल्ली : असुसचा नवा स्मार्टफोन जेनफोन मॅक्स 3 (ZC553KL) भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्हीही प्लॅटफॉर्मवर हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
भारतात हा फोन लाँच होणार असल्याचं कंपनीने गेल्या महिन्यातच जाहीर केलं होतं. दोन व्हर्जनमध्ये हा फोन भारतात उपलब्ध असून 5.2 इंच स्क्रीन फोनची किंमत 12 हजार 999 रुपये, तर 5.5 इंच आकाराची स्क्रीन असलेल्या फोनची किंमत 17 हजार 999 रुपये आहे.
असुसचा जेनफोन मॅक्स 3 (ZC520TL) हा 5.2 इंच आकाराची स्क्रीन असलेला फोन अगोदरपासूनच भारतात उपलब्ध आहे. जेनफोन मॅक्स 3 (ZC553KL) हे त्याचं नवं मॉडल आहे.
जेनफोन मॅक्स 3 (ZC553KL) मध्ये 5.5 इंच आकाराची स्क्रीन, 1.4GHz ऑक्टाकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिप प्रोसेसर, 3 GB रॅम, 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 4100mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.