Wrestling in Commonwealth 2022 : भारताची दिग्गज महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) सलग तिसऱ्यांदा कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) सुवर्णपदक जिंकलं आहे. नुकताच तिने  श्रीलंकेच्या चमोद्या केशानीला 53 किलो वजनी गटात मात देत सुवर्णपदक मिळवलं आहे. भारताचं यंदाच्या स्पर्धेतील हे 11 वं सुवर्णपदक आहे. 


विनेशने सामन्यात सुरुवातीपासून आपल्या अनुभवाचा पुरेपुर फायदा घेत समोरच्या कुस्तीपटूवर आपला दबाव कायम ठेवला. ज्यामुळे आधीच आघाडी घेतलेल्या विनेशने सामना 4-0 असा जिंकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याआधी विनेशने 2014 च्या ग्लासगो कॉमनवेल्थ आणि 2018 च्या गोल्डकोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.












भारताचं कुस्तीतील नवंव पदक 


भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थमध्ये अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहे. अंशूने रौैप्य तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये पराभूत दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवलं. त्यानंतर मोहित ग्रेवालने कांस्यपदक मिळवल्यानंतर पुजानेही कांस्यपदकाला गवसणी घातली ज्यानंतर काही वेळातच रवी दहियाने आणि विनेश फोगाटने सुवर्णपदक जिंकलं आहे. 








हे देखील वाचा-