Wrestling in Commonwealth 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारताचे पुरुष आणि महिला कुस्तीपटू कमाल फॉर्ममध्ये दिसून येत आहे. पुरुषांमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनियातर महिलांमध्ये साक्षी मलिक आणि अंशू मलिक यांनी थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. यामुळे भारताची स्पर्धेत किमान चार रौप्यपदकं निश्चित झाली आहेत.
बजरंग पुनियासह दीपक पुनियाची कमाल
आज कुस्ती सामन्यांना सुरुवात होताच कुस्तीमध्ये भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी कमाल करत आपले पहिले सामने जिंकले आहेत. बजरंगने नॉरूच्या लॉवे बिंघमला 4-0 ने तर दीपक पुनियाने न्यूझीलंडच्या मॅथ्यूला 10-0 ने मात दिली. त्यानंतर पुरुषांच्या 65 किलोग्राम फ्रीस्टाइल गटात बजरंगने आधी उपांत्यपूर्व फेरीत मॉरीशसच्या कुस्तीपटूला आणि नंतर उपांत्य फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेनुसार इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला मात देत फायनल गाठली आहे. दुसरीकडे दीपकने आधी 6-0 च्या फरकाने उपांत्यपूर्व फेरी जिंकली असून सेमीफायनलमध्ये कॅनडाच्या अॅलेक्झांडर मूरेला 3-1 च्या फरकाने मात देत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे.
साक्षी आणि अंशू मिलकचं पदकही निश्चित
पुरुषांसह महिला कुस्तीपटूंनी देखील कमाल कामगिरी करत फायनल गाठली आहे. यामध्ये अंशू मलिक आणि साक्षी मलिक यांनी अंतिम फेरीत पोहोचत किमान रौप्यपदक निश्चित केलं आहे. यावेळी फ्री स्टाईल 62 किलोग्राम गटात साक्षीने इंग्लंडच्या तर 57 किलोग्राम वजनी गटात अंशूने विजय मिळवत फायनल फेरी गाठली आहे. दुसरीकडे दिव्या काकरनदेखील कांस्य पदकासाठी सामना खेळणार आहे.
हे देखील वाचा-
- Commonwealth Games 2022 : किदम्बी श्रीकांतसह पीव्ही सिंधूचा प्रतिस्पर्ध्यांवर सोपा विजय, उपांत्यपूर्व फेरीत धडक
- CWG 2022 : बाबर आझमकडून पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टरला खास भेट, 'इतके' लाख बक्षिस म्हणून देणार
- Shreeshankar Murli: त्यानं ठरवलंच होतं, भारतासाठी पदक जिंकायचंच! लॉन्ग जंपमध्ये श्रीशंकरनं रौप्यपदक पटकावलं