Christiano Ronaldo Joins Man United: जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या पोर्तुगालचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला आहे. त्याने जुव्हेंट्स क्लब सोडला आहे. 36 वर्षीय रोनाल्डोने आज युव्हेंटस क्लबचे लॉकर रिकामे केले आणि मैदानावर शेवटच्या वेळी सहकारी खेळाडूंसोबत सराव केला.


जुव्हेंट्सचे प्रशिक्षक मॅसिमिलियानो यांनी सांगितले, की "काल गुरुवारी ख्रिस्तियानो रोनाल्डोने यापुढे जुव्हेंट्सकडून खेळण्याचा विचार नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला एम्पोलीविरुद्ध शनिवारच्या सामन्यासाठी बोलावण्यात येणार नाही,"


मँचेस्टर युनायटेडने रोनाल्डोशी संपर्क साधला
गुरुवारीच, हे स्पष्ट झाले की मँचेस्टर युनायटेडने रोनाल्डोच्या एजंटशी संपर्क साधला होता. परंतु, नंतर दोघांमध्ये कोणताही करार होऊ शकला नाही. असे सांगण्यात येत होते की जुव्हेंट्स रोनाल्डोसाठी 29 दशलक्ष युरो (सुमारे 252 कोटी रुपये) किंमत मिळवायची होती. मात्र, सिटीला या 36 वर्षीय स्टार खेळाडूची कोणतीही मोठी रक्कम द्यायची नव्हती. रोनाल्डोसाठी जुव्हेंट्सशी करार संपल्यामुळे ही एक मोठी अडचण झाली होती.


रोनाल्डोची तिन्ही लीगमधील खेळी
स्पोर्टींग सीपी संघाकडून सुरुवातीला खेळल्यानंतर ख्रिस्तियानोला इंग्लिश प्रिमीयर लीगमधील प्रसिद्ध क्लब मँचेस्टर युनायटेडने विकत घेतले होते. त्यांच्याकडून रोनाल्डोने 292 सामने खेळत 118 गोल केले. ज्यानंतर ला-लीगा अर्थात स्पेन फुटबॉल लीगमधील रिअल माद्रिदने रोनाल्डोला विकत घेतले. रिअल माद्रीदकडून रोनाल्डोने 438 सामन्यांत 450 गोल करत संघाला अनेक महत्त्वाचे किताब मिळवून दिले. त्यानंतर सध्या रोनाल्डोला सिरीज ए मधील जुव्हेंटस संघाने विकत घेतले आहे. जुव्हेंटसकडून रोनाल्डोने 133 सामन्यांत 101 गोल आतापर्यंत केले होते. आता तो मँचेस्टर सिटीत सहभागी झाला आहे.


काही दिवसांपूर्वीच मेस्सीनेही संघ बदलला..
तब्बल 17 वर्षात 778 सामने खेळत 672 गोल्स आणि 35 चषक मिळवून दिल्यानंतर लिओनल मेस्सीने बार्सिलोना संघ सोडला. मेस्सीने पीएसजी संघात जाण्याचा निर्णय घेतला. लिओनल मेस्सीला बार्सिलोना संघ सोडताना अश्रू अनावर झाले होते. मेस्सीने बार्सिलोना सोडल्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.