मोहाली : कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या 79 धावांच्या खेळीनंतरही चेन्नई सुपरकिंग्जला किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. चेन्नईला केवळ चार धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.


पंजाबच्या या विजयात सर्वात मोठी भूमिका अशा खेळाडूची होती, जो आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला होता. हा दुसरा तिसरा कुणी नसून वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने या सामन्यात 33 चेंडूत 63 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.

या सामन्यात प्रेक्षकांना खेळातल्या मैत्रीचा एक अनोखा क्षण पाहायला मिळाला. ख्रिस गेल आणि चेन्नईचा खेळाडू ड्वेन ब्राव्हो यांच्यातला हा क्षण होता. ख्रिस गेल लोकेश राहुलसोबत जेव्हा सलामीला आला तेव्हा त्याच्या बुटाची लेस सुटली. यानंतर गेलने आपला सहकारी खेळाडू आणि मित्र ब्राव्होला बोलावलं आणि लेस बांधायला सांगितली. ब्राव्होही तातडीने गेलच्या जवळ गेला आणि लेस बांधली.



खरं तर गेल आणि ब्राव्हो हे आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांचं प्रतिनिधित्व करतात. मात्र मैदानावर मैत्रीची भावना नेहमी जिवंत असते, याचं उदाहरण या दोघांमुळे पाहायला मिळालं.

पाहा व्हिडीओ :



संबंधित बातम्या :

सेहवागचा निर्णय गेलने सार्थ ठरवला!


... म्हणून अनसोल्ड राहिलेल्या गेलवर बोली लावली : सेहवाग


टी-20 मध्ये 800 षटकार पूर्ण, गेल एकमेव खेळाडू


VIDEO : जेव्हा ख्रिस गेल सनी लियॉनीच्या गाण्यावर थिरकतो...