मुंबई: वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज आणि आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामीवीर ख्रिस गेल, फलंदाजीसाठी जेवढा प्रसिद्ध आहे, तितकाच तो डान्समुळेही चर्चेत असतो.


मजा, मस्ती आणि एन्जॉय हे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचं वैशिष्ट्य आहे.

सध्या गेलचा एक डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल ज्या गाण्यावर डान्स करत आहे, ते गाणं कोणीही आपआपल्या पद्धतीने बदलून, स्वत:ला आवडेल ते गाणं गेलच्या डान्स व्हिडीओला जोडत आहेत.

गेल ज्या गाण्यावर डान्स करतो ते गाणं बिग बॉसची माजी स्पर्धक आणि हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीचं गाणं असल्याचं म्हटलं जात होतं. ‘तेरी आख्यां का यो काजल’ या गाण्यावर गेल थिरकल्याचं म्हटलं.

सपना चौधरीने स्वत:च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला. मात्र गेलने या गाण्यावर डान्स केलाच नसल्याचं समोर आलं.

VIDEO:


गेल नेमकं कोणत्या गाण्यावर नाचला?

सपना चौधरीने चुकीची पोस्ट शेअर केल्याचं अनेकांनी सांगितलं. खरंतर गेलने 9 महिन्यांपूर्वी म्हणजेच 15 जुलै 2017 रोजी हा डान्स केला होता.

त्यावेळी गेलने सनी लिओनीच्या ‘लैला मैं लैला’ या गाण्यावर डान्स केला होता. तेच ओरिजनल गाणं आणि तोच ओरिजनल व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ स्वत: ख्रिस गेलने इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

VIDEO:


नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला धुमारे

गेलचा हा डान्स पाहून, नेटिझन्सच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटले. त्यांनी गाणी एडिट केली आणि गेलच्या व्हिडीओला जोडली.

कुणी गेलला दिसला ग बाई दिसला गाण्यावर नाचवलं तर कुणी, ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरुवर.

गेलचे विविध गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ मात्र चांगलेच व्हायरल होत आहेत.

VIDEO: