आयपीएलसाठी चेन्नईच्या चाहत्यांनी संपूर्ण रेल्वेच बुक केली!
एबीपी माझा वेब टीम | 19 Apr 2018 09:45 PM (IST)
‘सीएसके’ला चिअर करण्यासाठी चेन्नईवरुन चाहत्यांनी भरलेली रेल्वे पुण्यात दाखल झाली आहे. या चाहत्यांच्या प्रवासाचा व्हिडीओ ‘सीएसके’नेच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
फोटो सौजन्य : सीएसके इंस्टाग्राम
पुणे : तामिळनाडूतील कावेरी वादामुळे चेन्नईमधील आयपीएलचे सर्व सामने रद्द झाले आहेत. त्यांचे सर्व सामने आता पुण्यात होणार आहे. त्यामुळे अनेक सीएसकेचे चाहते निराश झाले होते. पण, चेन्नईतील चाहत्यांनी निराशा झटकून आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी थेट पुणेच गाठलं. सीएसकेचे आयपीएलमधील पुढील सामने पुण्यात खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे चेन्नईतील चाहत्यांनी पुण्याला जायचे ठरवलं. पण, हे चाहते इतके होते की त्यांच्यासाठी संपूर्ण रेल्वेच बुक करावी लागली. ‘सीएसके’ला चिअर करण्यासाठी चेन्नईवरुन चाहत्यांनी भरलेली रेल्वे पुण्यात दाखल झाली आहे. या चाहत्यांच्या प्रवासाचा व्हिडीओ ‘सीएसके’नेच इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सीएसकेसाठी लोकांचे असे वेड पाहून अनेकजणांनी या चाहत्यांचे कौतुक केले आहे. सीएसकेला पाठिंबा देण्याचं मुख्य कारण म्हणजे ‘कॅप्टनकूल’ महेंद्र सिंह धोनी. त्यामुळे आपल्या लाडक्या खेळाडूला पाहण्यासाठी या चाहत्यांनी थेट पुण्यात येणंच पसंत केलं. VIDEO :