नाशिक : नाशकात भटक्या गायींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गायींच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.


नाशकातील इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. 64 वर्षीय शोभा जोशी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी चव्हाण टेकडी परिसरात गेल्या होत्या. त्यावेळी एका वासराने धक्का दिल्यामुळे त्या खाली पडल्या. तेवढ्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या इतर चार ते पाच गायींनी धावत येत शोभा यांच्यावर हल्ला केला.

एका गायीने शोभा जोशी यांना शिंगावर उचलत रस्त्यावर आपटलं. त्यांनी आरडाओरड सुरु करताच काही जणांनी गायींना हुसकावून लावलं आणि पुढील अनर्थ टळला.

या घटनेत शोभा जोशी यांचा हात, कंबर आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या उजव्या हातावर 30 टाके पडले आहेत.  महापालिकेने या मोकाट गायींचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.