पुणे : चुरशीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 13 धावांनी मात केली. विजय शंकर आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या भागीदारीने दिल्लीच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या, मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्लीला पाच बाद 198 धावांवरच रोखलं.
दिल्लीकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 45 चेंडूत 79 धावा केल्या. यामध्ये चार षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता. शिवाय विजय शंकरनेही 31 चेंडूंमध्ये नाबाद 54 धावा करुन ऋषभ पंतला छान साथ दिली. मात्र त्याला दिल्लीला विजय मिळवून देता आला नाही.
चेन्नईकडून फफ डू प्लेसिस आणि शेन वॉट्सन यांनी डावाची शानदार सुरुवात करुन दिली. शेन वॉट्सनने 40 चेंडूत 78, तर प्लेसिसने 33 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 51 आणि अंबाती रायडूने 41 धावांची खेळी केली आणि दिल्लीसमोर विजयासाठी 212 धावांचं आव्हान उभं केलं.
चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या आठ सामन्यांपैकी सहा विजय मिळवले आहेत. सीएसके गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर चार गुणांसह दिल्ली डेअरडेव्हिल्स सर्वात तळाला आहे.
चुरशीच्या लढतीत सीएसकेचा विजय, दिल्ली डेअरडेव्हिल्सवर मात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Apr 2018 11:48 PM (IST)
विजय शंकर आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या भागीदारीने दिल्लीच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या, मात्र चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्लीला पाच बाद 198 धावांवरच रोखलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -