मोहाली: विकेटकीपर रिद्धीमान साहा दुखापतग्रस्त झाल्यानं भारतीय संघात पार्थिव पटेलला जागा देण्यात आली. निवड समितीच्या या निर्णयानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. पण या निर्णयाचं टीम इंडियाचे प्रशिक्षक कुंबळेंनी समर्थन केलं आहे. आता कर्णधार विराट कोहलीनंही या निर्णयाबद्दल वक्तव्य केलं आहे.
कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या मते, संघात आपली जागा पक्की करण्यासाठी पार्थिवकडे ही नामी संधी आहे. खासकरुन परदेशी दौऱ्यांसाठी.
कोहली म्हणाला की, 'पार्थिव या संधींचा नक्कीच फायदा उठवेल. आणि परदेश दौऱ्यांमध्ये दुसरा विकेटकिपर म्हणून तो नक्कीच जागा मिळवेल.'
पार्थिवची खेळण्याची वृत्ती शानदार आहे. मी त्याच्यामध्ये कधीही बैचेनी पाहिलेली नाही. अशा वेळेचा खेळ समजण्यासाठी त्याच्याकडे भरपूर अनुभवही आहे. तो पुनरागमन करुन आपली छाप नक्कीच पाडेल. मागील काही वर्षापासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं सतत चांगलं प्रदर्शन केलं आहे.' असं विराट म्हणाला.
दरम्यान, पार्थिव पटेल तब्बल आठ वर्षानंतर कसोटी सामना खेळणार आहे.