सुमारे 94 टक्के लोकांनी मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तसंच या निर्णयामुळे थोडीशी गैरसोय झाली, मात्र त्याचा खूप असा त्रास झाला नाही, असंही मत बहुतेकांनी नोंदवलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, देशभरात वादाची राळ उठली आहे. मात्र मोदींच्या या निर्णयाबद्दल जनतेचं नेमकं मत काय? हे जाणण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला.
यासाठीच दहा प्रश्नांच्या माध्यमातून 'माझा'ने जनतेची मतं जाणून घेतली. त्या प्रश्नांचा सविस्तार आढावा -
1) नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाला तुमचा पाठिंबा आहे का?
- होय 93.75% (120,776 votes)
- नाही 6.25% (8,060 votes)
एकूण मते - 128, 992
2) नोटबंदीचा सर्वाधिक फटका कुणाला?
- श्रीमंत 75.23% (86,906 votes)
- गरीब 8.96% (10,354 votes)
- दोन्हीही 15.81% (18,265 votes)
एकूण मते : 115,525
3) नोटाबंदीमुळे देशातील काळा पैसा बाहेर येईल असं वाटतं का?
- होय 85.71% (100,817 votes)
- नाही 7.07% (8,312 votes)
- सांगता येत नाही 7.22% (8,503 votes)
एकूण मते : 117,632
4) ATM/बँकेच्या रांगेत उभं राहिल्यानंतर तुम्हाला किती वेळानंतर पैसे मिळाले?
- लगेचच 17.11% (18,591 votes)
- तासाभरात 52.32% (56,860 votes)
- त्यापेक्षा अधिक वेळ 22.39% (24,336 votes)
- पैसे मिळालेच नाही 8.17% (8,883 votes)
एकूण मते : 108,670
5) दोन हजाराच्या नोटेची आवश्यकता आहे असं वाटतं का?
- होय 35.85% (39,983 votes)
- नाही 64.15% (71,553 votes)
एकूण मते : 111,536
6) नोटबंदीमुळे व्यक्तीश: तुमची गैरसोय झाली आहे का?
- होय 10.86% (12,277 votes)
- नाही 35.10% (39,666 votes)
- थोडाशी गैरसोय, पण सहज उपाय 44.49% (50,276 votes)
- खूप गैरसोय, पण आम्ही ती सोडवू 9.55% (10,792 votes)
एकूण मते : 113,011
7) नोटाबंदीच्या अंमलबजावणीत सरकार अपयशी ठरलं आहे का?
- होय 12.63% (13,972 votes)
- नाही 87.37% (96,621 votes)
एकूण मते : 110,593
8) लग्नासाठी बँकेतून पैसे काढण्यासाठीच्या अटी जाचक आहेत असं वाटतं का?
- होय 32.88% (33,762 votes)
- नाही 67.12% (68,919 votes)
एकूण मते : 102,681
9) नोटाबंदीचं राजकारण कोण करतंय?
- भाजप 5.27% (5,606 votes)
- शिवसेना 9.64% (10,251 votes)
- काँग्रेस 55.9% (59,450 votes)
- राष्ट्रवादी 3.1% (3,297 votes)
- मनसे 1.48% (1,571 votes)
- वरीलपैकी सर्व 24.61% (26,168 votes)
एकूण मते : 106,343
10) नोटांबदीच्या निर्णयानंतर तुम्ही पुन्हा मोदींना मत द्याल का?
- होय 93.06% (106,078 votes)
- नाही 6.94% (7,912 votes)
एकूण मते : 113,990
हा सर्व्हे गुरुवारी दुपारी 12 ते आज शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात आला. हा ऑनलाईन सर्व्हे असल्याने तो सर्वांसाठी खुला होता.
नेटीझन्सनी एबीपी माझ्याच्या वेबसाईटवर लॉग-ऑन करुन आपली मतं नोंदवली. मत नोंदवून प्रत्येकाला निकाल पाहाता येत होता.