Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिला अष्टपैलू मिचेल मार्श स्पर्धेबाहेर होता आणि आता कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतग्रस्त आहे. मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी पुष्टी केली असून पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazelwood) सुद्धा स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. दोघेही खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. कमिन्स घोट्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. अशा स्थितीत स्टीव्ह स्मिथ किंवा ट्रॅव्हिस हेड यांच्याकडे ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.
31 वर्षीय कमिन्सने मुलाच्या जन्मामुळे श्रीलंका दौरा सोडला आहे. तो घोट्याच्या दुखापतीशीही झुंजत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळणार आहे. मॅकडोनाल्ड यांनी सांगितले की, “पॅट कमिन्स कोणत्याही प्रकारची गोलंदाजी पुन्हा सुरू करू शकला नाही, त्यामुळे त्याच्या खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. याचा अर्थ आम्हाला कर्णधाराची गरज आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड हे दोन खेळाडू आहेत ज्यांच्याशी आम्ही बोलत असून आमच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाची तयारी करत आहोत. ते दोन खेळाडू आहेत ज्यांच्याकडे आम्ही नेतृत्व शोधू, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “पॅटी खेळण्याची फारच कमी शक्यता आहे जी थोडी निराशाजनक आहे. आमच्याकडे जोश हेझलवूड देखील आहे जो सध्या संघर्ष करत आहे. त्याच्या उपचाराबाबत पुढील काही दिवसांत माहिती मिळेल. आमच्याकडे कर्णधारपदासाठी दोन पर्याय तयार आहेत (स्टीव्ह आणि ट्रॅव्हिस). पहिल्या कसोटी सामन्यात स्टीव्हने शानदार कामगिरी केली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे." कमिन्सने 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि 2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला जेतेपद मिळवून दिले. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने अलीकडेच जवळपास दशकभरानंतर पुन्हा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली.
इतर महत्वाच्या बातम्या