बंगळुरु : कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने बंगळुरुच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत इंग्लंडचा 75 धावांनी धुव्वा उडवून तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. 4 षटकात 25 धावा देऊन 6 विकेट्स घेणारा यजुवेंद्र चहल या विजयाचा खरा हिरो ठरला.


चहल टी ट्वेंटीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी टी ट्वेंटीमध्ये पाचपेक्षा अधिक विकेट घेण्याचा मान फक्त श्रीलंकेच्या अंजता मेंडिसच्या नावावर होता.

मेंडिसने 18 सप्टेंबर 2012 रोजी झिम्बाम्ब्वेविरुद्ध खेळताना 4 ओव्हरमध्ये 8 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या. त्याने टी ट्वेंटीमध्ये आतापर्यंत दोन वेळा 6 विकेट घेतल्या आहेत. मात्र अद्याप भारतीय गोलंदाजांच्या नावावर हा विक्रम नव्हता.

टी ट्वेंटीमध्ये पाच पेक्षा अधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चहल आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. कारण दोन वेळा मेंडिसने आतापर्यंत दोन वेळा सहा विकेट घेतल्या आहेत.

चहल हिरो, टीम इंडियाचा इंग्लंडवर 75 धावांनी विजय!