मुंबई : पक्षासाठी किंवा स्वतःसाठी नाही तर मुंबईतील मराठी माणसासाठी, भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी युतीचा हात पुढे केला होता. पण आता युतीचा विषय संपला, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत केली.


मुंबईतील दादरमध्ये मनसैनिकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसासाठी एकत्र येऊन लढण्याची गर्जना केली आहे.

सात वेळा फोन केला पण एकदाही फोन घेतला नाही : राज ठाकरे

भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या हातात मुंबई गेली तर मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत राहणार नाही. त्यामुळे मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरेंना सात वेळा फोन केला, पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

टाळी झिडकारली किंवा, लाथाडलं अशी चर्चा आहे. पण आपण मराठी माणसासाठी कुणाचेही पाय चाटू. मात्र मुंबई मराठी माणसापासून वेगळी करण्याचा प्रयत्न केला तर पाय छाटू असा इशारा, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

आधी विदर्भ वेगळा करायचा, मग मुंबईकडे वळायचं, असा भाजपचा डाव आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळाली हे भाजपच्या अजूनही डोक्यात आहे. त्यामुळेच गुजरातच्या हितासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव आणला. देशात दुसऱ्या मार्गावर बुलेट ट्रेन होऊ शकत नाही का, मुंबईतील मराठी माणूस गुजरातला कशाला जाईल, उलट गुजरातींना मुंबईत येणं सोपं व्हावं, यासाठी मोदी आणि शाहांचा बुलेट ट्रेनचा अट्टाहास आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला.

'थापा शब्दाला पर्याय भाजपा'

राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत भाजपचाही समाचार घेतला. भाजपकडून केवळ भूमीपूजनं केली जातात. तर नाशिकमध्ये सध्या उद्घाटनं सुरु आहेत, अशा शब्दात राज ठाकरेंनी नाशिकच्या विकास कामांचा दाखला दिला.

भाजपकडून केवळ आश्वासनं दिली जातात. थापा शब्दाला पर्यायी शब्द भाजपा आहे. गुगलला फेकू असं सर्च केलं तर मोदींचं नाव येतं, जगात आपली हीच प्रतिमा आहे का, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

भाजपने शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्वतःकडे पाहावं. भाजपही मुंबई महापालिकेत सत्तेत सहभागी आहे, हे विसरु नये, असंही राज ठाकरे म्हणाले.

नाशिक ही राज्यातील एकमेव महापालिका आहे, जिथे भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. पारदर्शी कारभाराच्या भाजप-शिवसेना फक्त गप्पा मारतात, पण पारदर्शी कारभार काय असतो, ते मी नाशिकध्ये दाखवून दिलंय, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

'कल्याण-डोंबिवलीची पुनरावृत्ती'

निवडणुकीआधी एकमेकांवर कुरघोडी करायची आणि सत्ता स्थापन्यासाठी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र यायचं ही शिवसेना - भाजपची प्रवृत्ती आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवेळीही असंच झालं, हे दोन्ही पक्ष एकमेकांना आतून सामील आहेत, असा आरोपही राज ठाकरेंनी केला.

'बाळासाहेबांच्या स्मारकाचं निमित्त, महापौर बंगल्याच्या जागेवर डोळा'

बाळासाहेबांच्या स्मारकाचं केवळ निमित्त असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. शिवसेनेला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या निमित्ताने महापौर बंगल्याची जागा हडप करायची आहे. त्यासाठीच शिवसेना भाजपला सोडत नाही. कारण भाजपला सोडलं तर जागा मिळणार नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

'पुढचे 18 दिवस व्यक्ती म्हणून नव्हे, पक्ष म्हणून उभे राहा'

आगामी निवडणुकीसाठी एकजुटीने उभं राहण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं. पुढचे 18 दिवस मनसैनिकांना व्यक्ती म्हणून नाही, तर पक्ष म्हणून उभं राहायचं आहे, असं ते म्हणाले.

मुंबई, पुणे, ठाणे या शहरांतील मराठी माणसांनी विचार करावा, की ही संधी गेली तर पुन्हा तुमच्या आयुष्यातील ५ वर्ष वाया जातील, असंही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान आपण आत्ता केवळ मनसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आणि युतीवर बोलण्यासाठी आलो, असं त्यांनी सांगितलं. प्रचारादरम्यान सर्व विषयावर सविस्तर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाचे मुद्दे :

  • शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आतून एकमेकांना सामील : राज ठाकरे

  • शिवसेनेची भाजपला दुखवायची इच्छा नाही : राज ठाकरे

  • सात वेळा फोन केला पण एकदाही फोन घेतला नाही : राज ठाकरे

  • युतीसाठी प्रामाणिक प्रयत्न, सात फोन केले, एकदाही उचलला नाही : राज ठाकरे

  • भाजप-शिवसेना आतून एकमेकांना मिळालेले आहेत : राज ठाकरे

  • बाळासाहेबांच्या स्मारकाचं निमित्त, महापौर जागेवर डोळा : राज ठाकरे

  • कल्याण डोंबिवलीला जे झालं तेच सुरु आहे, आधी भांडले मग पुन्हा एकत्र आले : राज ठाकरे

  • भाजप नको म्हणून मी हात पुढे केला होता : राज ठाकरे

  • आधी विदर्भ बाजुला करायचा, मग हळूहळू मुंबईकडे वळायचा डाव : राज ठाकरे

  • युतीचा प्रस्ताव - मी एकाच अंगाने विचार केला मराठी माणसासाठी मी कुणाचेही पाय चाटेन : राज ठाकरे

  • मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर पाय छाटेन : राज ठाकरे

  • राज ठाकरे स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी कोणाचेही पाय चाटणार : राज ठाकरे

  • राज ठाकरे स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी कोणाचेही पाय चाटेल : राज ठाकरे

  • युतीच्या प्रस्तावावर कोणी काही बोलतं, लाचारी पत्करली, गुडघे टेकले : राज ठाकरे

  • आज सगळं काही बोलणार नाही, येत्या काळात बोलायचंच आहे : राज ठाकरे

  • गाण्यातून लक्षात आलंच असेल की तयारी किती जबरदस्त आहे : राज ठाकरे

  • युतीसाठी प्रामाणिक प्रयत्न, सात फोन केले, एकदाही उचलला नाही : राज ठाकरे

  • सात वेळा फोन केला पण एकदाही फोन घेतला नाही : राज ठाकरे

  • शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आतून एकमेकांना सामील : राज ठाकरे























  • गुगलवर फेकू टाईप केलं की मोदींचं नावं येतं, पंतप्रधानांची जगभरात हीच प्रतिमा : राज ठाकरे

  • शिवसेनेवर भ्रष्टाचारात आरोप करतात, पण भाजपही महापालिकेत सत्तेत आहेच : राज ठाकरे

  • महाराष्ट्रात नाशिक या एकमेव महापालिकेत 5 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही : राज ठाकरे

  • नाशिकमध्ये रस्त्यात एकही खड्डा नाही : राज ठाकरे

  • मुंबईत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कोटींचं कंत्राट, नाशकात एक रुपयातची गरज नाही : राज ठाक

  • भ्रष्टाचाराचे आरोप करतात...भाजप 25 वर्ष शिवसेनेबरोबर होत.. फावडे एका हाताने नाही उचलले दोन हात लागले - राज ठाकरे

  • पारदर्शकता काय असते, ते नाशिकमध्ये दाखवून दिलंय : राज ठाकरे

  • भाजपचा गेल्या वेळचा जाहीरनामा काढा, कोणत्या गोष्टी पूर्ण केल्या पाहा : राज ठाकरे

  • मुंबई आणि मुंबईतील मराठी माणूस वाचवण्यासाठी शिवसेनेपुढे हात पुढे केला : राज ठाकरे

  • शिवसेनेसोबत युतीचा विषय आज माझ्यासाठी संपला : राज ठाकरे

  • युतीचा विषय आज माझ्यासाठी संपला : राज ठाकरे