बंगळुरुत कसोटी दौऱ्यापूर्वी विराटची टीम इंडियासह सिक्रेट ट्रेनिंग
विराटच्या या सरावावर अजिंक्य रहाणेही लक्ष ठेवून होता.
विराटनं आजवर 41 कसोटी सामन्यांमध्ये 44.02 च्या सरासरीनं 2,994 धावा केल्या आहेत. त्यानं आजवर 11 शतकं आणि 12 अर्धशतकं ठोकली आहेत. पण मागच्या सहा कसोटी सामन्यांत त्यानं एकही शतक ठोकलेलं नाही.
विराटनं नेट्समध्ये गोलंदाजांचा सामना केला. जवळपास अडीच तास विराटचा सराव सुरू होता. आगामी मोसमात कसोटी क्रिकेटचं आव्हान पेलण्यासाठी विराटची ही मेहनत सुरू आहे.
टीम इंडियाचं सराव सत्र दुपारी अडीच वाजता सुरू होणार होतं. पण विराट दीड वाजताच मैदानावर पोहोचला आणि संजय बांगरच्या देखरेखीखाली त्यानं दीड तास बॅटिंग केली.
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरसह मैदानात दिसला.
बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावर भारतीय संघाची तयारी सुरु आहे.
भारताच्या इतर फलंदाजांसोबत कर्णधार विराट कोहली तासंतास फलंदाजी करताना दिसत आहे.
टीम इंडियाचे शिलेदार वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी सज्ज होत आहेत. बंगळुरूत अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाचा सराव सुरू आहे.