मै कमांडंट रुस्तम पावरी इंडियन नेव्ही, खिलाडी अक्षय नव्या भूमिकेत
खिलाडी अक्षय कुमारच्या मच अवेटेड रुस्तम' सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत एलियाना डिक्रूझ झळकणार आहे.
विपुल रावल यांनी चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे.
वेनस्डे, बेबी सारख्या चित्रपटाचे मेकर नीरज पांडे यांनी रुस्तमची निर्मिती केली असून टिनू सुरेश देसाई यांचं हे दिग्दर्शकीय पदार्पण आहे.
अर्जन बाजवा, एशा गुप्ता यांच्याशिवाय उषा नाडकर्णी, सचिन खेडेकर यासारखे मराठमोळे चेहरेही यात दिसणार आहेत.
रुस्तम सिनेमात अक्षय कुमार एका नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. रुस्तम पावरी असे या व्यक्तिरेखेचं नाव आहे. रुस्तमवर विक्रम मखिजा या पत्नीच्या प्रियकराच्या हत्येचा आरोप असतो.
एअरलिफ्ट सिनेमानंतर अक्षय कुमार एका नव्या अवतारात पाहायला मिळणार आहे.
अक्षय कुमारने बुधवारी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करुन ‘रुस्तम’मधील आपल्या भूमिकेचं नाव सांगितलं होतं.
या सिनेमातल्या अक्षय कुमारच्या भूमिकेबाबत चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.
मुंबईतील गाजलेल्या नानावटी केसवर आधारित अक्षयच्या आगामी ‘रुस्तम’ चित्रपटाचा ट्रेलर ट्रेलर लाँच झाला आहे.