VIDEO : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचं बासरीवादन
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2016 11:08 AM (IST)
मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाला संघातला अनेक खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. सुरेश रैनानेही माहीचा एक व्हिडिओ पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. धोनी बासरीवादन करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. रैनाने या व्हिडिओचा तपशील दिलेला नसला तरी विमानतळावर हा कार्यक्रम रंगला असावा. टीम इंडियातील इतर सहकारी मजामस्ती करत असताना धोनीने आपली ही कला पेश केली असावी. कॅमेरासमोर नसताना धोनीचा नूर काहीसा वेगळाच असतो, असं टीम इंडियातील सहकारीही सांगतात. धोनीला अनेक कार्यक्रमांमध्ये डान्स करताना आणि गातानाही पाहिलं आहे. पाहा व्हिडिओ : https://twitter.com/ImRaina/status/750988012834660352