टायगर आता सुपरहिरोच्या भूमिकेत, ‘अ फ्लाईंग जट्ट’चा टीझर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2016 07:56 AM (IST)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या आगामी ‘अ फ्लाईंग जट्ट’ सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. रेमो डिसूजाने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून, बालाजी मोशन पिक्चर्सची निर्मितू आहे. या सिनेमाबद्दल रेमो सांगतो, “पंजाबी सुपरहिरो असणारा सिनेमा आहे. त्यामुळे तुम्हीच कल्पना करा की, सिनेमा कसा असेल.” या सिनेमात टायगर श्रॉफसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस आहे. मॅड मॅक्ससारख्या सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकरणारे नॅथन जोन्स या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 25 ऑगस्टला ‘अ फ्लाईंग जट्ट’ सिनेमा रिलीज होणार आहे. टायगर श्रॉफच्या सुपरहिरोमधील भूमिकेची सर्वांनाच उत्सुकतला लागली आहे. ‘अ फ्लाईंग जट्ट’चा टीझर :