मुंबई : इंग्लंडविरुद्घ होणाऱ्या आगामी टी-ट्वेण्टी मालिकेआधी भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-ट्वेण्टी मालिकेतून बाहेर झाला आहे.
बुमराहसोबतच फिरकीपटू वॉशिंगटन सुंदरही दुखापतीमुळे या टी-ट्वेण्टी मालिकेला मुकणार आहे. वॉशिंगटन सुंदर आयर्लंडविरुद्धच्या सामन्याआधी झालेल्या सरावादरम्यान फुटबॉल खेळताना जमखी झाला होता. तर आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेण्टी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना बुमराहला दुखापत झाली होती.
बुमराह संघाबाहेर जाणे भारतीय संघासाठी मोठा झटका आहे. कारण अखेरच्या षटकांत अचूक गोलंदाजी करत समोरच्या संघाला अडचणीत आणण्यासाठी जसप्रीत बुमराह ओळखला जातो.
दरम्यान, बुमराह टी-ट्वेण्टी मालिकेला मुकणार असला तरीही तो इंग्लडविरुद्धच्या वनडे मालिकेपर्यंत फीट होणार असल्याचं समजतंय.
इग्लंडविरुद्ध भारतीय संघाची टी-ट्वेण्टी मालिका 3 जुलैपासून तर वनडे मालिका 12 जुलैपासून सुरु होत आहे.
इंग्लंड दौऱ्याआधी भारताला धक्का, बुमराह टी-ट्वेण्टी मालिकेतून बाहेर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jun 2018 11:58 PM (IST)
बुमराह संघाबाहेर जाणे भारतीय संघासाठी मोठा झटका आहे. कारण अखेरच्या षटकांत अचूक गोलंदाजी करत समोरच्या संघाला अडचणीत आणण्यासाठी जसप्रीत बुमराह ओळखला जातो.
बुमराने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 15 विकेट्स नावावर केल्या. यापूर्वी दोन देशांमध्ये खेळवल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक 14 विकेट्स घेण्याच्या विक्रमाची नोंद आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -