VIDEO : भाजप आमदाराच्या मुलाची भर रस्त्यात गुंडगिरी
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2018 08:48 PM (IST)
भाजप आमदाराच्या मुलाने ही गुंडगिरी 1 जून 2018 रोजी केली. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
जयपूर : राजस्थानमधील भाजप आमदाराच्या मुलाच्या गुंडगिरीचा व्हिडीओ समोर आला आहे. आमदार धनसिंह रावत यांच्या मुलाने भर रस्त्यात दुसऱ्या गाडीतील व्यक्तीला बेदम मारहाण केली. राजा असे भाजप आमदार धनसिंह रावत यांच्या मुलाचे नाव आहे. नेमकं काय झालं? राजा बांसवाडा विद्युत कॉलनी परिसरातून आपल्या गाडीतून जात होता. त्यावेळी समोरील गाडीने त्याला ओव्हरटेक करण्यासाठी रस्ता दिला नाही. त्यामुळे राजा संतापला. त्यानंतर त्याने गाडी पुढे नेली आणि ओव्हरटेक करु न देणाऱ्या गाडीच्या आडवी त्याची गाडी लावली. गाडीतून उतरत राजाने दुसऱ्या गाडीतल्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. भाजप आमदाराच्या मुलाने ही गुंडगिरी 1 जून 2018 रोजी केली. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. भाजप आमदाराच्या मुलाच्या गुंडगिरीचा व्हिडीओ :