दुबई : टीम इंडियाचा युवा गोलंदाज जसप्रित बुमराने आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
आयसीसीने जारी केलेल्या ताज्या टी-20 रँकिंगमध्ये पाकिस्तानचा गोलंदाज इमाद वसीमने दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिरला खेचत पहिलं स्थान पटकावलं आहे.
या रँकिंगमध्ये बुमराच्या नावावर 764 गुण आहेत. तर पाकिस्तानचा गोलंदाज 780 गुणांसह 16 गुणांनी बुमराच्या पुढे आहे. तर ताहिरची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. यावर्षी जानेवारीमध्ये बुमराहने टी-20 रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं होतं.
फलंदाजांमध्ये विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अरॉन फिंच दुसऱ्या आणि न्यूझीलंडचा केन विल्यम्सन तिसऱ्या स्थानावर आहे.