Mary Kom Divorce : हार्दिक पांड्या, शिखर धवननंतर आता ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर मेरी कोमच्या (Boxer Mary Kom) आयुष्यात सुद्धा वादळं आलं आहे. मेरी कोमने तिचा पती करूंग ओन्लरपासून घटस्फोटाची अधिकृतपणे घोषणा केल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. इतकेच नव्हे, तर 20 डिसेंबर 2023 रोजी दोन्ही कुटुंबे आणि वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत, कोम प्रथा कायद्यानुसार परस्पर संमतीने हे जोडपे वेगळे झाल्याची माहिती समोर आली आहे. 2005 मेरी कोम आणि करुंग ओन्लरने विवाह केला होता. तेव्हापासून ओन्लर मेरीसोबत सावलीप्रमाणे होता. आता घटस्फोटाच्या जवळजवळ 16 महिन्यांनी त्यांनी नात तुटल्याची घोषणा केली आहे. अनेकांनी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अफवा पसरवण्यास सुरुवात केली तेव्हा तिने या विषयावर प्रतिक्रिया दिली.
मेरी कोमने अफेअरच्या अफवांवर मौन सोडले
गेल्या काही दिवसांपासून मेरी कोमचा व्यावसायिक भागीदार आणि मेरी कोम बॉक्सिंग फाउंडेशनचा अध्यक्ष हितेश चौधरीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. ही चर्चा रंगली असतानाच दुसऱ्या बॉक्सरच्या पतीसोबत तिच्या संबंधांचेही आरोप होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर, मेरी कोमने तिच्याकडून जारी केलेली कायदेशीर नोटीस शेअर केली. नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की तिचा घटस्फोट काही महिन्यांपूर्वी मैत्रीपूर्ण झाला होता आणि ती पुढे गेली आहे आणि तिच्या मागील लग्नावर अधिक भाष्य करू इच्छित नाही. निवेदनानुसार, हितेश चौधरी किंवा इतर कोणाशीही डेट केल्याच्या अफवा पूर्णपणे निराधार आणि खोट्या आहेत. निवेदनात मीडिया प्लॅटफॉर्मना तिच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आणि चुकीची माहिती पसरवणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मेरी कोमने चाहत्यांना आवाहनही केले
सूचनांचे पालन न केल्यास बदनामी आणि गोपनीयता कायद्यांचे उल्लंघन यासह कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. मेरी कोमने असेही सांगितले की गेल्या दोन वर्षांचा काळ तिच्यासाठी वैयक्तिकरित्या कठीण होता आणि तिने तिच्या चाहत्यांना, मित्रांना आणि जनतेला तिला आवश्यक असलेली जागा देण्याचे आवाहन केले.
मेरी कोमने 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकले. याशिवाय, 42 वर्षीय बॉक्सरने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 6 सुवर्णपदकांसह 8 पदके जिंकली आहेत. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 6 सुवर्णपदके जिंकणारी ती जगातील एकमेव महिला बॉक्सर आहे. तिला 2006 मध्ये पद्मश्री, 2013 मध्ये पद्मभूषण आणि 2020 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या