Boris Becker Released From UK Jail For Deportation: जर्मनीचा माजी टेनिसपटू बोरिस बेकर (Boris Becker) यांची गुरूवारी (16 डिसेंबर) ब्रिटनच्या तुरुंगातून सुटका करण्यात आलीय. त्याला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली होती. मात्र, आठ महिन्याचा तुरुंगवास भोगल्यानंतरच त्याची सुटका करण्यात आली. बोरिसला इंग्लंडमधील (England) तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. आठ महिन्यांच्या शिक्षेदरम्यान त्याला अनेकदा वेगवेगळ्या तरूंगात हलवण्यात आलं होतं. सुटकेपूर्वी तो ऑक्सफर्डशायरच्या (Oxfordshire) हंटरकॉम्बे तुरुंगात (Huntercombe Jail) कैद होता. तुरूंगातून सुटका केल्यानंतर बोरिसला त्याच्या मायदेशी जर्मनीला परत पाठवलं जाईल. 


ट्वीट-









 


बोरिस बेकरला शिक्षा का झाली?
बोरिसला 21 जून 2017 रोजी दिवाळखोर घोषित करण्यात आलं. लंडनच्या साउथवार्क क्राउन कोर्टानं बोरिसला चुकीच्या पद्धतीनं मालमत्ता लपवल्याप्रकरणी एप्रिलमध्ये तुरुंगवासाची शिक्षा ठोठवण्यात आली. बोरिस हा 2012 पासून इंग्लंडमध्ये राहत असल्यानं त्याला तिथल्याच तुरुंगात टाकण्यात आलं.


बेकरच्या वकीलांनी काय म्हटलंय?
बेकरचे वकील क्रिस्टियन ओलिवर मोसर यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "बेकरनं आपली शिक्षा भोगली आहे आणि दंड संहितेनुसार जर्मनीमध्ये त्याच्यावर कारवाई केली जाणार नाही".


इंग्लंडमधून हद्दपार होणार शक्यता
द गार्डियननं दिलेल्या वृत्तात टेनिस चॅम्पियनला इंग्लंडमधून हद्दपार केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण तो ब्रिटीश नागरिकत्व नसलेला परदेशी नागरिक आहे. त्याला 12 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. एकदा निर्वासित झाल्यानंतर बेकर 10 वर्षांसाठी यूकेमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकणार नाही.


बोरिसची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
बोरिस 1985 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी विम्बल्डन एकेरीचं विजेतेपद पटकावणारा पहिला बिगरमानांकित खेळाडू बनला होता. बोरिसनं आपल्या कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम जिंकले, ज्यात विम्बल्डन तीन वेळा, ऑस्ट्रेलियन ओपन दोनदा आणि यूएस ओपन एकदा जिंकली आहे.


हे देखील वाचा-