किंग्स्टनः वेगाचा बादशाह उसेन बोल्ट निवृत्तीआधी आपल्या मायभूमीत म्हणजेच जमैकातल्या रेसर्स ग्रांप्रीमध्ये सहभागी होणार आहे. उसेन बोल्टची आपल्या घरच्या मैदानातली ही अखेरची शर्यत असेल.


30 वर्षीय उसेन बोल्ट पुढच्या वर्षी लंडनमध्ये 5 ते 13 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर निवृत्त होणार आहे. पण त्याआधी जमैकन नागरिकांसाठी मी रेसर्स ग्रांप्रीमध्ये सहभागी होणार असल्याचं बोल्टनं म्हटलं आहे.

10 जूनला रेसर्स ग्रांप्रीचं आयोजन केलं जाणार आहे. दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बोल्टला 100 आणि 200 मीटर्स शर्यतीसाठी वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे. पण या दोन्ही शर्यतींमध्ये सहभागी व्हायचं की एकच शर्यत पूर्ण करायची याबाबचा कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचं बोल्टनं म्हटलं आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ही आपल्या कारकीर्दीतली अखेरची स्पर्धा असल्याचं बोल्टनं स्पष्ट केलं आहे.