नवी दिल्लीः पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल 1.34 रुपये प्रति लीटर, तर डिझेल 2.37 रुपयांनी महाग झालं आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.

काही दिवसांपूर्वीच डीलर्सच्या कमिशनमध्ये वाढ झाल्याने पेट्रोलच्या किमतीत 14 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत 10 पैशांनी वाढ झाली होती. मात्र यावेळी पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

मागच्या महिन्यात म्हणजे 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पेट्रोल 28 पैशांनी महागलं होतं, तर डिझेल सहा पैशांनी स्वस्त झालं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती लक्षात घेऊन तेल कंपन्यानी पेट्रोल डीझेलचे दर वाढवले आहेत.

https://twitter.com/PTI_News/status/787289025186889728