पणजीः ब्रिक्स परिषदेच्या पहिल्याच दिवशी भारत आणि रशियामध्ये 16 महत्वपूर्ण करार झाले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परिषदेदरम्यान भेट झाली. दोघांनी 16 करारांवर स्वाक्षरी केली.


रशिया भारताचा जुना मित्रः मोदी

भारत आणि रशिया यांच्यात मैत्रीचं जुनं नातं आहे. दहशतावद संपवण्यासाठी रशिया भारताच्या ठामपणे पाठिशी आहे, असं सांगत दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी रशियाच्या भूमिकेचं स्वागत केलं.

राष्ट्रपती पुतिन आणि आपल्याकडून दहशतवाद आणि त्याला समर्थन देणाऱ्यांना बिलकुल खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे ठणकावलं.

भारत-रशियामधील महत्वाचे करार

भारत आणि रशिया यांच्यात एस 400 मिसाईल सिस्टीमबाबतचा करार झाला. यासोबतच कामोव्ह हेलिकॉप्टर खरेदीचाही करार झाला. अणुऊर्जा, गॅस पाईप लाईन, स्मार्ट सिटी, जहाज बांधणी यांसह 16 महत्वपूर्ण करारांवर दोन्ही देशांकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं.