मुंबई: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा पराभव झाला असला तरी त्यांच्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय संघानं अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली आहे. तसंच महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यचा विक्रमही मितालीनं यावेळी रचला आहे. तिच्या याच कामिगिरीमुळे तिला आता BMW कार गिफ्ट मिळणार आहे.


ज्युनिअर क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि तेलंगणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष चामुंडेश्वरनाथ यांनी मितालीला BMW कार देण्याची घोषणा केली आहे. चामुंडेश्वरनाथ यांनी याआधीही काही खेळाडूंना कार भेट दिल्या आहेत.

मिताली राजनं महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नुकताच आपल्या नावावर केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत चामुंडेश्वरनाथ यांनी मितालीचं कौतुक केलं आहे. 'महिला क्रिकेट टीम चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. यामुळे भविष्यात अधिक मुली खेळाकडे वळतील.' असं चामुंडेश्वरनाथ म्हणाले.

मिताली दुसऱ्यांदा कार गिफ्ट मिळाली आहे. 2007 साली चामुंडेश्वरनाथ यांनीच तिला शेवरलेटची कार गिफ्ट दिली होती. मितालीशिवाय ऑलिम्पिक पदक  विजेत्या पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांनाही कार गिफ्ट दिल्या होत्या.