मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अशी ओळख मिळालेल्या हार्दिक पंड्याने आज वयाच्या 24 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून जबरदस्त कामगिरी करत पंड्याने टीम इंडियाच्या वन डे आणि टी-20 संघात जागा मिळाली. त्यानंतर यावर्षी त्याने कसोटीतही पदार्पण केलं. प्रत्येक ठिकाणी त्याने स्वतःची जागा निर्माण केली आहे.


हार्दिक पंड्या आणि षटकारांची हॅटट्रिक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डेत हार्दिक पंड्याने सिक्सर्सची हॅटट्रिक केली. मात्र ही पहिलीच वेळ नव्हती. या वर्षात पांड्याने सलग तीन षटकारांचा धमाका चार वेळा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत, पांड्याने पाकिस्तानविरुद्ध दोनवेळा षटकारांची हॅटट्रिक केली होती.  आधी इमाद वासीमला पांड्याने तीन सिक्सर ठोकले होते. त्यानंतर अंतिम सामन्यात शादाब खानलाही पांड्याने तीन षटकारांचं गिफ्ट दिलं होतं.

यानंतर मग नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातही, कसोटी सामन्यात पांड्याने श्रीलंकेच्या मलिंदा पुष्पकुमाराला सलग तीन षटकार ठोकले होते. त्यामुळे पांड्याच्या नावावर आता षटकारांच्या चार हॅटट्रिक जमा झाल्या आहेत.

कपिलदेव यांच्याशी तुलना

अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याची तुलना टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्याशी केली जाते. मात्र कपिलदेव यांच्या तुलनेत हार्दिक पंड्या पुढे आहे. पंड्याने आतापर्यंत 26 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये 40.46 च्या सरासरीने त्याच्या नावावर 530 धावा आहेत. तर कपिलदेव यांच्या नावावर पहिल्या 26 वन डेत 472 धावा होत्या.

पंड्याने 26 वन डेत 530 धावा, 29 विकेट आणि 10 झेल घेतले आहेत. तर कपिलदेव यांनी पहिल्या 26 वन डेत 472 धावा, 28 विकेट आणि 7 झेल घेतले होते. या तुलनेने हार्दिक पंड्या कपिलदेव यांच्याही पुढे आहे.

कपिलदेव यांच्या नेतृत्त्वात भारताला पहिला विश्वचषक मिळाला होता. जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून कपिलदेव यांच्याकडे पाहिलं जायचं. त्याचप्रमाणे आता फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सगळ्याच बाबतीत पंड्या कपिलदेव यांच्या पुढे आहे.

पंड्या जगातल्या कोणत्याही मैदानात चौकार, षटकार ठोकू शकतो : शास्त्री

पंड्या एक स्फोटक खेळाडू आहे. फिरकीपटूंविरोधात तो अधिक आक्रमक खेळतो. फिरकीपटूंविरोधात खेळणारा त्याच्यासारखा खेळाडू अजून पाहिला नाही. युवराज सिंह त्याच्या सुरुवातीच्या काळात असाच आक्रमक होता. हे दोघं जगातील कोणत्याही मैदानावर चौकार आणि षटकार ठोकू शकतात, असं रवी शास्त्री म्हणाले.

फलंदाजीसाठी कोणत्याही क्रमांकावर हिट

भोपाळमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डेत पंड्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं होतं. टीम इंडियाचा

कर्णधार विराट कोहली म्हणाला, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या सांगण्यावरुनच हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या पंड्याने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 72 चेंडूत 78 धावा ठोकल्या. त्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियाचं 294 धावांचं लक्ष्य सहज पार केलं.

5 चेंडूत 26 धावा, पंड्याचं कसोटीत वादळी शतक


यावर्षी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कॅण्डीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांची बॅट तळपली. यामध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याने सर्वाधिक आक्रमक शतकी खेळी केली. एका षटकात 26 धावा ठोकून त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

हार्दिक पंड्याने एका षटकात 26 धावा ठोकल्या. कसोटीमध्ये एका षटकात 26 धावा ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या नावावर कसोटीत एका षटकात सर्वाधिक 24 धावा ठोकण्याचा विक्रम होता.

कसोटीतलं शतक आणि पंड्याचे विक्रम

  1. एका षटकात 26 धावा ठोकून त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. कसोटीमध्ये एका षटकात 26 धावा ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या नावावर कसोटीत एका षटकात सर्वाधिक 24 धावा ठोकण्याचा विक्रम होता.

  2. पंड्याने पहिल्या 50 धावा 61 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. तर नंतरच्या 50 धावा केवळ 25 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. यामध्ये एकाच षटकात 26 धावा ठोकल्यामुळे पंड्याने जलद शतक पूर्ण केलं.

  3. चहापानापर्यंत 107 धावा ठोकणारा हार्दिक पंड्या पहिलाच भारतीय खेळाडू आहे. चहापानाच्या अगोदर पंड्याने शतक पूर्ण केलं होतं. यापूर्वी वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध 2006 साली चहापानापर्यंत 99 धावा पूर्ण केल्या होत्या.

  4. पंड्याने कसोटी कारकीर्दीतलं पहिलंच शतक पूर्ण केलं.

  5. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात वेगवान शतक पूर्ण करणाराही तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.

  6. या सामन्यात पंड्याने सलग तीन षटकार ठोकले. यासोबतच या वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीतही पंड्या चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने या वर्षात एकूण 26 षटकार ठोकले आहेत. या वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर इयॉन मॉर्गन (33), दुसऱ्या क्रमांकावर एव्हिन लेविस (32), तर 27 षटकार ठोकणारा बेन स्टोक तिसऱ्या क्रमांकावर आहे.


आयपीएलमध्ये एकाच संघात खेळणारे दोन भाऊ

कृणाल हा हार्दिकपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. दोघे सख्खे भाऊ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहेत. हे दोघे पहिलेच भाऊ आहेत जे आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळत आहेत.

इरफान आणि युसूफ पठाण बंधू आयपीएलमध्ये खेळतात, मात्र ते दोघेही वेगवेगळी टीममध्ये आहेत. हार्दिक आणि कृणाल पांड्या दोघेही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहेत.

हार्दिक पंड्यापेक्षा कृणाल 20 पट महागडा आहे. यंदा झालेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने कृणालसाठी 2 कोटी रुपये मोजले, तर 2015 मध्ये तितका प्रकाशझोतात नसलेला हार्दिकला केवळ 10 लाख रुपयांत खरेदी केलं होतं.

हार्दिक आणि कृणाल दोघेही रणजी सामन्यात बडोद्याकडून खेळतात.

संबंधित बातम्या :

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कपिलदेवच्याही पुढे


हार्दिक पांड्या शानदार खेळाडू : स्टीव्ह स्मिथ


सामनावीर हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल!


'त्या' खेळीचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला : हार्दिक पांड्या 


हार्दिक पंड्यासोबत अफेअरची चर्चा, परिणीती चोप्राचं स्पष्टीकरण


पहिलं शतक ठोकल्यानंतर हार्दिक पंड्याचं वडिलांना खास गिफ्ट


मी धोनीकडून बरंच काही शिकलो : हार्दिक पंड्या


शतकी खेळीसोबतच हार्दिक पंड्याचे 6 विक्रम