केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने लिहिलेल्या पत्रात ही मागणी करण्यात आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासारखीच कोहलीची कामगिरीही विराट असल्याचं सांगत काही बाबतीत विराट अव्वल ठरत असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे.
फक्त भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही विराटने अत्युच्च कामगिरी केली आहे. टी20 विश्वचषकातील त्याच्या कामगिरीची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. कोहलीचा बॅटिंग अॅव्हरेज जगात उत्तम असल्याचंही फेडरेशनने नमूद केलं आहे. क्रिकेट हा भारतात लोकप्रिय खेळ असल्यामुळे विराटला 'भारतरत्न' देऊन त्याचा गौरव केंद्र सरकारने करावा, असंही पत्रात म्हटलं आहे.
ही मागणी मान्य झाल्यास 'भारतरत्न'ने सन्मानित केला जाणारा विराट हा दुसरा क्रीडापटू ठरेल. आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकरचाच अपवादाने 'भारतरत्न' प्रदान करुन गौरव करण्यात आला आहे.
https://twitter.com/aigfmumbai/status/745198314904227840