मुंबई : ब्रिटीश आटोमोबाइल कंपनी रोल्स रॉयसने भारतात आपली नवी लक्झरी कनव्हर्टेबल कार डॉन आज भारतात लाँच केली. फॅटम, घोस्ट आणि रेथनंतर रोल्स रॉयसनची भारतात लाँच होणारी ही चौथी चार चाकी गाडी आहे. सध्या मुंबईत या कारची शोरूम किंमत 6.25 कोटी आहे.
या कारचे वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये 6.6 लीटर टर्बोचार्जड V12 हे इंजिन जोडण्यात आले आहे. यामुळे या गाडीचा स्पीड 563bhp आहे. यामध्ये 8 स्पीज ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही कार 5 सेकंदात 100 किलोमीटर अंतर कापू शकते. या कारचा मॅक्सिमम स्पीड ताशी 250 किमी आहे.
या कारच्या आतील बाजूस आटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, 16 स्पीकर प्रिमिअर ऑडिओ सिस्टिम, 10 इंचाचा टच स्क्रिन एचडी नेविगेशन डिस्प्ले आहे. मल्टिमीडिया नेविगेशन आणि जेस्जर सेंसिटिव टचपॅडसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची केबीन पुर्णपणे सायलेंस बँलेन्स मॅनेज करणार आहे, असा कंपनीचा दावा आहे.