Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) स्पर्धेसाठी भारतीय संघ (Team India) सज्ज झाला आहे.  8 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत विविध खेळांत जगभरातील टॉपचे खेळाडू सहभागी होतील. यावेळी भारताचे 215 खेळाडू 16 वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. या सर्वांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुभेच्छा देत त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीचा विश्वास असल्याचं म्हटलं आहे.


पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत कॉमनवेल्थमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले,'बर्मिंगहममध्ये 2022 च्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा. मला विश्वास आहे की आमचे खेळाडू त्यांचे सर्वोत्तम खेळ करतील आणि त्यांच्या उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शनाद्वारे भारतातील लोकांना प्रेरणा देत राहतील.'






 


या स्पर्धेत भारतासह 72 देशांतील 5 हजार 54 खेळाडू यात सहभागी होतील. 11 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 20 विविध खेळांच्या 280 स्पर्धा खेळवल्या जातील. स्पर्धेतील सर्व सामन्यांच लाईव्ह ब्रॉडकास्ट सोनी पिक्चर्स नेटवर्क (Sony TV) वर केलं जाणार आहे. त्यामुळे भारतीय दर्शक Commonwealth Games 2022 चं लाईव्ह ब्रॉडकास्ट Sony TEN 1, Sony TEN 2, Sony TEN 3, Sony SIX आणि Sony TEN 4 चॅनलवर पाहू शकतात. याशिवाय कॉमनवेल्थ खेळांचं मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग Sony Liv या अॅपवर होणार आहे.  


हे देखील वाचा-