मुंबई : बंगालचा युवा ऑफ स्पिनर रितीक चॅटर्जीनं एकही धाव न देता सहा विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या डिव्हिजनच्या दोन दिवसीय सामन्यात रितीकनं ही कामगिरी बजावली.   त्याने भवानीपूर संघाकडून खेळताना मोहमेडन स्पोर्टिंग विरुद्ध सामन्यादरम्यान दोन षटकं आणि दोन चेंडूंमध्ये एकही धाव न देता सहा विकेट्स काढल्या. त्यामुळेच भवानीपूर संघाने मोहम्मदन स्पोर्टिंगवर 253 धावांनी मात केली.   23 वर्षीय रितीक चॅटर्जीनं याआधी अंडर 19 स्तरावर आणि तीन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये बंगालचं प्रतिनिधित्वही केलं होतं.