मुंबई : इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन पहिल्यांदाच सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. रविवारी सकाळी ते मुंबईत दाखल झाले. दोन्ही देशांचे संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मुंबईतल्या ताज हॉटेलला भेट देत त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच हॉटेल ताजमधील कर्मचाऱ्यांशी बातचीतही केली.
त्यानंतर ओव्हल मैदानावर खेळण्यात येणाऱ्या एका क्रिकेट सामन्यालाही प्रिन्स विल्यम यांनी हजेरी लावली. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली पत्नी अंजलीसह मैदानावर हजर होता. दोघांची भेट हा अत्यंत आनंददायी अनुभव असल्याचं सचिन म्हणाला. प्रिन्स विल्यम्स आणि केट अत्यंत नम्र आणि साधे असल्याचंही मास्टरब्लास्टरने म्हटलं आहे.
https://twitter.com/ANI_news/status/719108641656188929
https://twitter.com/ANI_news/status/719109465857896448
रात्री प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन बॉलिवूडच्या कलाकारांसोबत त्यांच्या डिनरचा कार्यक्रम आहे. सोमवारी ते दिल्लीला रवाना होणार आहेत. 12 एप्रिलला पंतप्रधानांनी दोघांसाठी लंच आयोजित केलं आहे.
सात दिवसांच्या दौऱ्यात ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिज आग्य्रातला ताजमहाल, आसामचं काझीरंगा नॅशनल पार्क, भूतानलाही ते भेट देणार आहेत.