अनुपम खेर यांची श्रीनगर विमानतळावर पोलिसांकडून अडवणूक
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2016 12:36 PM (IST)
श्रीनगर : सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगर विमानतळावर अडवणूक केल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी खेर यांना श्रीनगर एनआयटी म्हणजेच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश करण्यास मनाई केल्याची माहिती आहे. काहीच दिवसांपूर्वी श्रीनगर एनआयटीमध्ये स्थानिक आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष उसळला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी अनुपम खेर यांना दिल्लीला परतण्यास सांगितल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. अनुपम खेर रविवारी सकाळी श्रीनगर विमानतळावर उतरले होते. विद्यार्थ्यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी ते काश्मीर दौऱ्यावर आले होते. रविवारी सकाळी त्यांनी ट्विटरवरुन आपला मानस व्यक्त केला होता. 'श्रीनगरला पोहचलो. हे 'घरा'पासून दूर असलेलं घर आहे. एनआयटी श्रीनगरला जाणार. विद्यार्थ्यांची भेट घेणार. त्यांना मिठी मारणार आणि एक भेटही देणार' असं त्यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. https://twitter.com/AnupamPkher/status/719020729329582080 त्यानंतर केलेल्या ट्वीटमध्ये, पोलिसांनी आपली अडवणूक केल्याचं खेर यांनी सांगितलं. मला कोणतीही समस्या निर्माण करायची नसून विद्यार्थ्यांची भेट घ्यायची आहे, असं ते म्हणाले. टी 20 विश्वचषकातील उपान्त्य फेरीत वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव झाल्यानंतर एनआयटी परिसरात स्थानिक आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांत संघर्ष निर्माण झाला होता. https://twitter.com/AnupamPkher/status/719035897618927617 https://twitter.com/AnupamPkher/status/719037865074630656 https://twitter.com/AnupamPkher/status/719054893130997760 https://twitter.com/AnupamPkher/status/719087046069846016