नवी दिल्लीः टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी सर्वात फिट खेळाडूंपैकी एक मानला जातो. धोनीचा या वयातील फिटनेस पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. मैदानात धावा काढण्याची धोनीची क्षमता देखील कमालीची आहे.
धोनीचा हा फिटनेस फंडा बीसीसीआयने उघड केला आहे. बीसीसीआयने धोनी जीममध्ये व्यायाम करत असतानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये धोनी ट्रेनरसोबत वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहे.
पाहा व्हिडिओः
https://twitter.com/BCCI/status/742924683423649792