बालाजी तांबे यांच्याविरोधात गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2016 04:33 AM (IST)
अहमदनगर : लेखक बालाजी तांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकात पुत्रप्राप्तीसाठी उपाय सुचवून त्याचा प्रचार आणि प्रसार केल्याने, प्रकाशक आणि तांबेंविरोधात प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनटीडी) भंग केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास बालाजी तांबेंसह प्रकाशकांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सांकडे पुस्तकाचे लेखक, प्रकाशक आणि विक्रेत्यांविरोधात तक्रार केली होती. त्यावर संबंधितांकडून खुलासे मागवण्यात आले होते.