महिला संघातील प्रत्येक खेळाडूला BCCI कडून 50 लाखांचं बक्षिस
एबीपी माझा वेब टीम | 22 Jul 2017 04:32 PM (IST)
आयसीसी महिला विश्वचषकात मिताली राजची ब्रिगेड चमकदार कामगिरी बजावत आहे. त्यामुळेच बीसीसीआयने महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : आयसीसी महिला विश्वचषकात मिताली राजची ब्रिगेड चमकदार कामगिरी बजावत आहे. त्यामुळेच बीसीसीआयने महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. सहा वेळा विजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघावर 36 धावांनी मात करत भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वात रविवारी टीम इंडिया इंग्लंडचा सामना करणार आहे. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सीके खन्ना यांनी महिला संघाचा यथोचित गौरव करणार असल्याचं शुक्रवारी जाहीर केलं होतं. आपला शब्द पाळत त्यांनी महिला संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपयांचं रोख पारितोषिक घोषित केलं आहे. सर्पोटिंग स्टाफमधील प्रत्येकाला 25 लाख रुपये इनाम मिळणार आहे.