मुंबई: बीसीसीआयने सलामीचा शिखर धवन आणि महिला क्रिकेटर स्मृती मानधना यांच्या नावाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी ही माहिती दिली. शिखर धवन हा तिन्ही फॉरमॅट्समध्ये खेळणारा टीम इंडियाचा नियमित सलामीचा फलंदाज आहे.
तर 21 वर्षांच्या स्मृती मानधनानं गेल्या वर्षीच्या महिला विश्वचषकात सातत्यपूर्ण कामगिरी बजावली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातल्या मालिकेतही तिनं नऊ सामन्यांमध्ये 531 धावांचा रतीब घातला आहे.
दुसरीकडे बीसीसीआयने वर्ल्ड इलेव्हन संघासाठी भारताकडून हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक यांची नावं पाठवली आहेत.
वर्ल्ड इलेव्हन टीम 31 मे रोजी लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध चॅरिटी टी 20 सामना खेळणार आहे. वेस्ट इंडिजचं नेतृत्व कार्लोस ब्रेथवेट करणार आहे.