मुंबई : 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमातल्या महिलांविषयीच्या आक्षेपार्ह विधानांप्रकरणी हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई बीसीसीआयच्या प्रशासकांनी दोन आठवड्यांनी मागे घेतली आहे.
सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीने हार्दिक पंडयाचा भारतीय संघामध्ये समावेश केला आहे. तर केएल राहुलचा भारतीय ‘अ’ संघात समावेश केला आहे. या बद्दलची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त अॅमिकस क्युरी पी. एस. नरसिंह यांच्याशी चर्चा करुनच बीसीसीआयच्या प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होऊ शकतो, तर केएल राहुल राष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा भारत 'अ' संघाकडून खेळू शकतो.
दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोकपालांकडून पंड्या आणि राहुल यांची चौकशी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात पाच फेब्रुवारीला होत असलेल्या सुनावणीत लोकपालांची नियुक्ती करण्यात येईल.
न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत भारताने सध्या 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तर कर्णधार विराट कोहलीला शेवटच्या दोन वनडेसाठी विश्रांती देण्यात येणार आहे.
का केलं बीसीसीआयने हार्दिक पंड्या आणि केएल राहुलचं निलंबन, काय आहे प्रकरण?
25 वर्षीय हार्दिक पंड्या केएल राहुलसह चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये आला होता. या शोमध्ये त्याने अनेक वादग्रस्त टिप्पणी केल्या होत्या. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच अडचण नाही आणि मी त्यांच्याशी त्यांच्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने शोमध्ये सांगितलं.
आपण अनेक महिलांसोबत रिलेशनशिप होतो आणि ही बाब पालकांनाही माहित असल्याची कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली. तो म्हणाला की, "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं.
यानंतर सोशल मीडियावर हार्दिक पंड्याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. या टिप्पणीनंतर सगळ्यांनीच सोशल मीडियावर त्याची शाळा घेतली. आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने बुधवारी एका ट्वीटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत माफी मागितली. "कॉफी विद करणध्ये माझ्या टिप्पणीमुळे जे दुखावले किंवा ज्यांना अपमान झाल्याचं वाटलं त्या सगळ्यांची माफी मागतो. मी जरा जास्तच बोललो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. सन्मान"
संबधित बातम्या
करणची कॉफी भोवली, पंड्या आणि राहुल निलंबित
राहुल-पंड्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर विराटची प्रतिक्रिया
हार्दिक आणि राहुलवर दोन वनडे सामन्यांच्या बंदीची शिफारस
पंड्या आणि राहुलच्या निलंबनानंतर ‘या’ दोन खेळाडूंची संघात निवड
पंड्या आणि राहुलचे निलंबन मागे, भारतीय संघात पुनरागमन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2019 07:01 AM (IST)
सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त अॅमिकस क्युरी पी. एस. नरसिंह यांच्याशी चर्चा करुनच बीसीसीआयच्या प्रशासकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होऊ शकतो, तर केएल राहुल राष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा भारत 'अ' संघाकडून खेळू शकतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -