नवी दिल्लीः भारताच्या 500 व्या कसोटीच्या निमित्ताने भारताच्या सर्व माजी कर्णधारांना कार्यक्रमासाठी बीसीसीआयकडून निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र यामध्ये केवळ माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला त्यांच्यावरील आजीवन बंदीमुळे निमंत्रण देण्यात येणार नसल्याची चर्चा होती. मात्र आता मोहम्मद अझरुद्दीन कार्यक्रमासाठी हजेरी लावणार असल्याचं निश्चित झालं आहे.

मोहम्मद अझरुद्दीन यांचाही भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं असून ते कायर्कमासाठी हजर असतील, अशी माहिती उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे राजीव शुक्ला यांनी दिली. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, दिलीप वेंगसरकर, के. श्रीकांत यांनी निमंत्रण स्वीकारलं असल्याची माहितीही शुक्ला यांनी दिली.

मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर मॅच फिक्सिंगमुळे आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र या प्रकरणात न्यायालयाकडून त्यांची निर्दोष सुटकाही करण्यात आली. तरीही बीसीसीआयकडून त्यांना निमंत्रण देण्यात येणार नाही, अशी चर्चा होती.