मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सह्याद्री' वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मराठा मोर्चा, मराठा आरक्षण यांसह अनेक मुद्द्यांवर रोखठोक मतं मांडली. विशेषत: मराठा मोर्चावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे मुलाखत देत मौन सोडलं.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील 15 महत्त्वाचे मुद्दे :

 

  • मराठा मोर्चा म्हणजे आक्रोश, अनेक वर्षांचा आक्रोश- मुख्यमंत्री


 

  • बहुतांश मराठा समाजात गरिबी - मुख्यमंत्री


 

  • एकमेकांविरोधात मोर्चांची गरज नाही - मुख्यमंत्री


 

  • मराठा समाजाचे प्रश्न सर्वांनी मिळून सोडवू - मुख्यमंत्री


 

  • मराठा मोर्चा कोणत्याही जातीविरोधातील मोर्चा नाही, मराठा मोर्चा म्हणजे विस्थापितांचा प्रस्थापितांविरोधातील मोर्चा- मुख्यमंत्री


 

  • अॅट्रॉसिटीच्या गैरवापरामुळे मराठा समाजात संताप - मुख्यमंत्री


 

  • प्रतिमोर्चे काढू नये, ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्य - मुख्यमंत्री


 

  • मोर्चाला प्रतिमोर्चा काढणं योग्य नाही, महाराष्ट्राची सामाजिक घडी बिघडू नये - मुख्यमंत्री


 

  • मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने गांभिर्याने भूमिका घेतली आहे - मुख्यमंत्री


 

  • मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे - मुख्यमंत्री


 

  • मराठा नेत्यांनी स्वत:ची सोय बघितली, समाजाची नाही - मुख्यमंत्री


 

  • मराठा आरक्षणाने सर्वच प्रश्न सुटणार नाहीत - मुख्यमंत्री


 

  • आजच्या घडीला सर्वच समाजांमध्ये थोड्या-अधिक प्रमाणात आर्थिक मागासलेपणा आहे - मुख्यमंत्री


 

  • कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे - मुख्यमंत्री


 

  • मराठा मोर्चाच्या प्रतिनिधींनी आमच्याशी चर्चा करावी, चर्चेतून प्रश्न सोडवू - मुख्यमंत्री