मुंबई : पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बाराव्या इंडियन प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. शिवाय या सोहळ्यासाठी राखून ठेवलेली रक्कम सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे.

शुक्रवारी (22 फेब्रुवारी) बीसीसीआय प्रशासकांच्या नवी दिल्लीतल्या बैठकीत घेण्यात आला आहे. "आम्ही आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द केला आहे आणि या सोहळ्यासाठी राखून ठेवण्यात आलेली पाच कोटी रुपयांहून अधिक रक्कम शहीदांच्या कुटुंबियांसाठीच्या निधीला देण्यात येईल," असं बीसीसीआय प्रशासक विनोद राय यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणूक आणि आगामी विश्वचषक लक्षात घेऊन यंदा आयपीएलच्या सामन्यांना 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघांमधल्या सामन्याने या आयपीएलची सुरुवात होईल. पण या सामन्याआधी उद्धाटन सोहळ्याच्या झगमगाटाला काट देण्यात आली आहे.

VIDEO | पाकिस्तानला क्रिकेटच्याही मैदानात पराभूत करा : सचिन तेंडुलकर