नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या आणि भारतीय संघाचे माजीर कर्णधार म्हणून ओळख असणाऱ्या सौरव गांगुली sourav gangulyयांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळं त्याला शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या बातमीचं सर्वच क्रीडा रसिकांची चिंता वाढली.

शनिवारी रात्री त्यांच्या तब्येतीत काही चढ उतारही पाहायला मिळाले. पण, अखेर आता त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं रुग्णालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये स्पष्ट करण्यात आलं.

रुग्णालयातून दिलेल्या माहितीनुसार 'दादा' गांगुलींच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत आहे. त्याला पुरेशी झोपही मिळत आहे. त्याचा पल्स रेट 70 आहे. तर, रक्तदाब 110/70 आहे. रविवारी सकाळी त्यांचा ईसीजीही काढण्यात आला. त्याला पुढील काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाअंतर्गत ठेवण्यात येणार आहे.

शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिला मातोंडकरांकडून कोट्यवधींच्या ऑफिसची खरेदी

गांगुलींची एंजियोप्लास्टी...

सुत्रांच्या माहितीनुसार, व्यायामशाळेत व्यायाम करताना त्यांची तब्येत बिघडली आहे. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

शनिवारीच त्यांची एंजिओप्लास्टीही करण्यात आली. त्यांच्या हृदयाच्या नसांमध्ये स्टेंट घालण्यात आलं होतं.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत, सौरव गागुंलींची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही गांगुली लवकरात लवकर बरे व्हावं अशी प्रार्थना केल्याचं पाहायला मिळालं होतं. क्रीडा विश्वातून गांगुली यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच क्रीडा रसिकांनाही त्यांची चिंता असल्याचं पाहायला मिळालं. पण, त्यांच्या प्रकृतीत होणारे सकारात्मक बदल पाहता सर्वांनाच दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल.